देशात मिळाले आज एवढे कोरोना बांधीत ………

नवी दिल्ली – देशात करोना दिवसे दिवस वाढत आहे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ९६ हजार ५५१ रुग्णांची भर पडलीय तर एकाच दिवशी तब्बल १ हजार २०९ जणांनी करोनामुळे मुत्यू झाली आहे. याचसोबत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचलीय.
एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ लाख ४३ हजार ४८० जणांवर उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी करोनावर पूर्णपणे मात केली आहे तर भारतात करोनामुळे मुत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आजवर ७६ हजार २७१ वर पोहचलीय
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मिळाले आहे . महाराष्ट्रात दररोज रुग्णांच्या संख्येत भर पडताना दिसतेय. रुग्णसंख्येत क्रमांक १ वर असलेल्या महाराष्ट्रानं अद्याप आपलं यादीतलं स्थान कायम राखलंय. महाराष्ट्रात सध्या २ लाख ५३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २७ हजार ७८७ जणांचा मृत्यू झाला. आता पर्यंत राज्यात तब्बल ६ लाख ८६ हजार ४६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली..