DNA मराठी

देवेंद्र फडणवीस यांची कृषी विधायका वरून शिवसेना वर टीका 

0 73

नागपूर  – शिवसेना हा पक्ष लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतो. आमच्यासोबत जेव्हा सत्तेत असताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका घेतल्या. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्राने जे कृषी विधेयकाला मंजुरी दिली ते विधेयकाला शेतकर्‍यांचा विरोध नाही आहे . त्यांनी तर याचा स्वागतच केले आहे. मात्र काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काल जी विधेयके राज्यसभेने मंजूर केली ती ऐतिहासिक आहे. शेतकर्‍यांच्या आयुष्यात क्रांती करणारी आहे. एक देश-एक बाजार यामुळे आता शक्य होणार आहे. शेतकर्‍याने आपला माल कुठे विकायचा याची मुभा त्याला मिळणार आहे. या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. आपण राज्यात जेव्हा असा कायदा केला तेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती आणि तेथे शेतकरी थेट विक्री करतो आहे हे पाहिले आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  हा मुद्दा आमच्यासाठी राजकारणाचा नाही. शेतकर्‍यांचे शोषण थांबविणे  याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावर गेल्या १० वर्षांपासून सकारात्मक चर्चा झाली आहे. पण सध्या केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे असेही फडणवीस म्हणाले.

Related Posts
1 of 2,489

 नीती आयोगाने शेती सुधारणांसाठी माझ्या अध्यक्षतेत मुख्यमंत्र्यांचा एक टास्क फोर्स गठीत केला होता. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ, कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री हे या टास्कफोर्समध्ये होते. तेव्हा सर्वांनी हीच मागणी केली होती. डॉ. स्वामिनाथन आयोगाने अशाच प्रकारच्या शिफारसी केल्या होत्या. हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचे काम केवळ मोदी सरकार करीत आहे.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: