देवीदास बादलकर यांची कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदी निवड

0 25

जामखेड –  जामखेड शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी युवक कार्यकर्ते देवीदास बादलकर यांची निवड करण्यात आली याबाबतचे पत्र महसूलमंत्री व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे शनिवारी देण्यात आले.

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकी लक्षात घेता शहरातील पदाधिकारी बदलण्याचे सत्र कॉंग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने येथील जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले यांनी शहर व तालुक्यात कॉग्रेसला संजीवनी देण्याच्या दृष्टीने पक्षात मोठे बदल घडवून आणले आहेत त्यांचा फॉर्म्युला युवकांना कॉंग्रेस पक्षात आकर्षण आणण्यासाठी यशस्वी ठरत आहे त्यादृष्टीने मागील वर्षभरापासून राहुल उगले प्रयत्न करत आहे.

 कोरोनारुग्णांना लुटणारे  १५  हाॅस्पिटल प्रशासनाच्या रडारावर..

संगमनेर येथे महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात असल्याने त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी यांना बोलावून जामखेड काँग्रेस शहराध्यक्षपदी  देविदास भादलकर यांची निवड केली व नियुक्ती पत्र दिले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जामखेड तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, जिल्हा सचिव सुनील शिंदे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले , जामखेड तालुका युवक अध्यक्ष शिवराज घुमरे, फिरोज पठाण, ज्योतीताई गोलेकर, कुंडल राळेभात उपस्थित होते.

Related Posts
1 of 1,291

 हे पण पहा – स्टॅंडिंग म्हणजे काय? बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंटसाठी न्यायालयात 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: