दूरदृष्टी, कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे – विजयराव शेंडे

0 27

सौजन्य विजयराव शेंडे मित्र परिवार – 

श्रीगोंदा   :-  श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सरपंच विजयराव शेंडे हे नाव आज जगाला परिचित आहे. तालुक्यातील शेडगाव येथील  “रस्ते विकासाचा महामेरू” म्हणूनच गौरव होईल इतके कार्य आज युद्धपातळीवर काम केले आहे. पण जेव्हा हे नाव मागील पंचवार्षिक निवडणूकीनंतर विजयी होत असताना हा शेडगाव कर आनंदात होता आणि त्याचा आनंद हा गगनात ही मावणार नाही अशी विलक्षण अनुभूती त्यावेळी प्रत्येकाची होती. कारण विजयराव प्रत्येकाला आपलेच वाटतात.

मुळात विजयराव शेंडे यांचे  कार्य आणि कर्तृत्व ह्यावर अनेकांनी भरपूर कौतुक  केले आहे. आज राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षाशी त्यांची जी जवळीक आहे ती सुद्धा शब्दांच्या पलीकडची आहे. पण राजकरणापलीकडचे विजयराव ह्यावर सुद्धा पुस्तक होईल इतकं त्यांचे कार्य विपुल आहे. मैत्रीतले विजयराव,नात्यातले विजयराव ,सामाजिक बांधिलकी जपणारे विजयराव शेंडे , इतर राजकीय पक्ष आणि स्वतःच्या पार्टीतले बाळासाहेब नाहाटा आज अनेक वलयांच्या अवतीभवती असतांना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे त्याने मला तरी अचंबित व्हायला होतं.

माणूस म्हणून स्वतः भोवती एवढे परिघ असतांना प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याची विजय शेंडे यांची  शैली अफाट आहे. विजयराव एक माणूस इतक्या वेगवेगळ्या भूमिकेतून बघतांना आपण अवाक होऊ इतकं काम त्यांचं प्रत्येक क्षेत्रांत आजही आहे आणि उद्याही राहील.

              अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना मँट कोर्टाचा मोठा दिलासा

विद्यमान सरपंच विजयराव शेंडे या  नावातच एक विलक्षण दूर दृष्टी ही बघायवयास मिळते.राजकारणी नेता समाजाभिमुख,तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि विजय शेंडे आज त्यात अग्रेसर आहेत. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व नाही याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले व एकसंघ  संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले पुढे विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत,मुदसद्दी राजकारणी अर्थात शेडगावचे सरपंच विजयराव शेंडेआपल्या कामासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी विजयराव हे सुप्रसिद्ध आहेतच.

Related Posts
1 of 1,290

रस्ते बांधकाम विषयाची आवड पाहता रस्त्यांची आवड ही त्यांच्या दमदार कामगिरीतुन आज दिसून येते आहे. त्यांनी शेडगावत  रस्त्यांचे जाळेच विणायला सुरुवात केली अर्थात, याचे पूर्ण श्रेय ध्येय असणाऱ्या आणि ते ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या  विजयराव शेंडे याना जाते. पत्रकारांशी बोलताना असो किंवा सामान्य जनतेशी गप्पा मारताना असो विजयराव शेंडे  दिलखुलास आणि मनमोकळे बोलतात. आपले यश-अपयश सांगायला ते कुठेही स्वतःला कमी लेखत नाहीत आज विजयराव आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहेत.

                 हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत 

विजयराव शेंडे यांच्या कामांची यादी संपणारी नाही. त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुभव हा शब्दातीत आहे. मग जनता दरबार असो किंवा रुग्णांना मदत करणे असो,सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असो,क्रीडा क्षेत्रातील कार्य असो,विजयराव यांच्या  कामांचा लेखाजोखा न संपणारा असाच आहे.

याचीपूर्तता करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण, कामच इतक्या प्रचंड प्रमाणात झाले आहे की त्याला तोड नाहीच. इतकं असूनसुद्धा कौटुंबिक वातावरणात ही विजयराव आपुलकी आणि ममत्व जपणारे आहेत. याचा अनुभव नुकताच अतिरुद्र निमित्ताने आला. सर्वांची आपुलकीने त्यांनी आमची विचारपूस केली त्यावेळी आम्ही तरी काहीवेळ वेगळ्याच विश्वात घेऊन जाते असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. हे अनेकांनी बघितले. आज या सरपंच पदावर असतांना सुद्धा त्यांनी प्रत्येक क्षेत्रांत जे स्थान निर्माण केले आहे ते शब्दांच्या पलीकडचे आहे.

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त व प्रत्येकाला अभिमान वाटावा असेच आहे आणि आम्हा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील जनतेला आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज गावाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच.आपले ग्रामदैवत दत्तगुरू आपल्याला निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना. आपली पुढील वाटचाल अशीच भरारी घेत राहावी हीच सदिच्छा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: