दिपीका पदुकोणच्या मॅनेजरला एनसीबीचे समन्स

मुंबई – सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणातून पुढे आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण यामध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहे अभिनेत्री रिया चक्रवती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिराड यांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होत आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर श्रुती मोदी आणि मॅनेजर जया शहा यांची चौकशी करत असताना अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचे मॅनेजर करिष्मा प्रकाशचे नाव आता समोर आले आहे.
म्हणून एन सी बी ने त्यांना समन बजावला आहे.व्हाट्सअप चॅट मधून ड्रग्स खरेदी-विक्री बद्दल दीपिका पादुकोणचे (Deepika Padukone) मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर जया सहा यांच्यात बोलणे झाले होते असे आढळून आले आहे.