दीपिका ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करताना अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत . यातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे बॉलीवूडचे ड्रग्स अँगल ! यातून अनेक बडे कलाकार ड्रग्स च्या आहारी गेले असल्याचे पुरावे NCB च्या हाती लागले आहेत.दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत आहे . या प्रकरणात फेमस अभिनेत्री दीपिका पदुकोण चे नाव समोर आले आहे .ड्रग्स विषयाची तिची चॅट सर्वांसमोर आली आहे .
हे सर्व खुलासे होत असताना आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलिवूडमध्ये 95 टक्के लोक ड्रग्ज घेतात असा दावा केला आहे. एवढंच नाही तर ,दीपिका पदुकोण ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली होती असं तिने म्हटले आहे . शर्लिन म्हणाली की बॉलीवूडची कुठलीही पार्टी ड्रग्ज शिवाय होत नाही.तसेच ड्रग्ज घेणाऱ्या सगळ्यांची नावे NCB ला सांगायला मी तयार आहे.
तिने म्हटले आहे कि- जर सारा, दीपिका यांची चौकशी झाली तर खूप प्रसिद्ध नावे समोर येतील. तसेच तिने जया बच्चन याना विनंती केली आहे की त्यांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये .