दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण ; ICU मध्ये दाखल !

देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला आहे . सामान्यांसहित अनेक राजकीय मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. भारतात एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने ५६ लाखांचा आकडा पार केला असून ९० हजारांखून अधिक लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. अनलॉक ची घोषणा झाल्यानंतर का कोरोनारुग्णांमध्ये झपाट्याने वाढहोत आहे.
आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. मनीष सिसोदिया यांचे वय 48 वर्षे आहे . त्यांच्या शरीरातून ऑक्सीजनचा स्तर कमी झाला होता तसेच ताप येत होता .
सध्या मनीष सिसोदिया डॉक्टरांच्या निगराणीखाली कोरोनावर उपचार घेत आहेत,डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे . गरज पडल्यास त्यांना ऑक्सिजन दिलं जाऊ शकते. दरम्यान दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती ते होम आयसोलेशनमध्ये होते.