दिल्लीमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोले यांच्या नावाची चर्चा ?

0 27

नवी दिल्ली – मागच्या काही दिवसांपासून राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार आणि आपल्याकडे एकापेक्षा जास्त पदाची जबाबदार असल्याने सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपला राजीनामा देणार याची चर्चा जोराने होत होती.

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये सुद्धा आता राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे हालचाली सुरु झाले आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे.

मात्र राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि राहुल गांधी यांच्या विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव यांच्या नावाची सुद्धा चर्चा झाली आहे.

Related Posts
1 of 1,321

विजय वडेट्टीवार यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण यांनी दिल्लीमधील हायकमांडकडे शब्द टाकल्याची देखील चर्चा आहे.

जर नाना पटोले यांचं नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित झाला तर महाराष्ट्रात विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे पाहावे लागेल.

सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मागच्या काही दिवसापूर्वी या बाबत प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हटले होते की या पदासाठी तरुण पिढीला संधी द्यावे आम्ही त्याच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहून काम करू.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: