दिग्दर्शक अनुराग कश्यपवर या मराठी अभिनेत्रीने केला लैंगिक छळाचा आरोप

0 13

मुंबई –  अभिनेत्री पायल घोषने  याने  दिग्दर्शक अनुराग कश्यपवर  लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. २०१४ मध्ये अनुराग कश्यपने आपल्यावर जबरदस्ती केली होती, असं पायलने सांगितलं आहे. ६ वर्षा नंतर नेमकं अनुरागने तिच्या साबोत काय केलं होतं. ते तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. यानंतर सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील आपल्यासोबत बड्या अभिनेत्यांनी केलेल्या वागणुकीबद्दलचा अनुभव व्यक्त केला आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितलं आहे  तसं माझ्यासह अनेक अभिनेत्यांनीही केलं आहे. बंद व्हॅन किंवा बंद खोलीत ते असं करायचे. पार्टीमध्ये फ्रेंडली डान्स करता करतात अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ लावायचे. कामासाठी घरी बोलवायचे आणि मग तुमच्यासह जबरदस्ती करायचे अनुराग कश्यपबाबत बोलताना कंगनाने ट्वीट केलं आहे  पायल घोषने जे काही सांगितलं तसं अनुराग करू शकतो. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवलं आहे. तो मोनोगॅमस नाही हे त्याने स्वत:च स्वीकार केलं आहे. अनुरागने पायलसह जे काही केलं  ते बुलिवूडमध्ये सर्रासपणे होतं. स्ट्रगल करणाऱ्या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात  असं कंगनानं सांगितलं. 

Related Posts
1 of 1,407

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मदतीला मराठीतीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आली आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तू अत्यंत प्रामाणिक व्यक्त आहेत. तू नेहमीच मला आदरानं वागवलं आहेस. मी कधीच शब्दात तुला हे सांगितलं नाही.कारण मला कधीच त्याची गरज वाटली नाही. परंतु आज मला तुझे आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी धन्यवाद. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: