दाऊदच्या हस्तकच्या धमकी वरून मातोश्रीवर खडबड

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राहते घर मातोश्रीला उडवून देण्याची धमकी तसेच मुख्यमंत्रीला जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल काल रात्री आला होता. हे कॉल दाऊद इब्राहिमच्या हस्तकच्या होता असे सांगितले जात आहे. या कॉलनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी या कॉलची तपास करण्याचे तात्काळ आदेश दिले आहे.
हे कॉल मातोश्रीवरील लँडलाईन वर तीन ते चार वेळा आला होता.आपण दाऊद इब्राहिमच्या हस्तक बोलत आहे मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचा आहे अशी ती व्यक्ती कॉल वर म्हणत होती.
या सर्व घटनावर राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते एडवोकेट अनिल परब यांनी अशी माहिती दिली की- रात्री मातोश्रीच्या लँडलाईन वर एक निनावी कॉल आला होता त्याने मातोश्रीला बॉम्बेनें उडवण्याची धमकी दिली नाही.
त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं अशी माहिती परब यांनी दिली या निनावी कॉल बद्दल पोलिसाना कळवण्यात आला आहे तसेच हा फोन का आला होता? कोणी केला होता ? आणि बोलणारा व्यक्ती हे दाऊद इब्राहिमच्या हस्तक होता का नाही ? याच्या तपास पोलीस करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.