त्रिकुटाचा राजकीय बळी घेणारा बळीराजा विजयराव शेंडे

0 31

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते म्हणजे त्रिकुट एकत्र येऊन विद्यमान सरपंच तथा पॅनल प्रमुख विजयराव शेंडे यांच्या विरोधात पॅनल उभा केला मात्र विजयराव शेंडे यांनी त्रिकुटाचा बळी घेत तब्बल आपले ८ उमेदवार निवडून आणून त्रिकुटाचा बळी घेतला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सरपंच तथा पॅनल प्रमुख विजयराव शेंडे यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत अवघ्या ३ जागांवर विजय मानावा लागला तर विजयराव यांनी बाजीप्रभू यांच्याप्रमाणे खिंड लढवत ग्रामपंचायत आखाड्यात तब्बल ८ वीज़यी केले आहेत या निवडणुकीत गावातील सर्व पक्षाचे सर्व गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी एका पॅनल उभा केला होता तरीही त्यांना अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले तर इकडे दोन्ही सोसायटीचे चेरमन व्हा चेरमन तसेच संचालक वृंद तसेच माजी ६ सरपंच यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर व गावात केलेल्या विकासाच्या जोरावर विजयराव शेंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ८ उमेदवार विजयी केले आहे.

त्यामुळे जनतेने विकासाला साथ दिली आहे असे विजयराव शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यावेळी ते पुढे म्हणाले कि ही तर माझ्या कामाची पावती आहे हीच मला मतदार राजाने दिली आहे त्यामुळे विरोधकांना कोणताही मुद्दा नसताना केवळ धनाच्या जोरावरती राजकारणात उतरून विरोध भासविण्याचा त्यांनी कठोर प्रयत्न केला आहे मात्र मतदार राजांनी त्यांना अचूक उत्तर देत यांचा भरघोस मतांनी पराभव केला आहे.

Related Posts
1 of 1,292

त्यामुळे झालेल्या कामाशी दिलेल्या शब्दाशी मी आहोरात्र कटिबद्ध राहणार आहे असेही त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले कि आपण गावच्या विकासासाठी राजकारणात आलो आहोत गावचा विकास सोडून आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये तसेच गावच्या विकास हेच आपले ध्येय आणि धोरण असेल त्यामुळे आपली दृष्टी विकासातील दिशा गतिमानता असली पाहिजे असे त्यांनी बोलताना सांगितले त्यावेळी त्यांनी सांगितले की अजूनही मला गावचा बऱ्याच प्रमाणे विकास करण्याचा बाकी आहे अजूनही काही वाड्या-वस्त्या वरती रस्ते पथदिवे तसेच वृक्षलागवड पिण्याच्या पाण्याची सोय अशी अनेक कामे करायची आहे त्यासाठी जनतेने मला भरभरून मतदान करून निवडून दिले आहे आणि मी त्यांच्या दिलेल्या विश्वासास आटोकाट प्रयत्न करून पात्र राहील असेही विजयराव म्हणाले आहेत .

त्यामुळे त्यांना श्री रामदास स्वामी यांच्या काव्यातील काही पंक्ती निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी। तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची?।। यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ। सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।। या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।। कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।। लागू होताना दिसत आहेत त्यामुळे गावातील त्रिकुटाचा बळी बळीराजा म्हणजे विजयराव शेंडे यांनी घेतला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: