त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – अजित पवार

0 36

पुणे –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिला कडून लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरून आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावई समीर खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या अटकेमुळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडता दिसत नाही आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेते किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता तर आज भारतीय जनता पक्षाच्या नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि आयपीएस विश्वास नागरे पाटील यांच्या भेटीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करून राष्ट्रवादी पक्षावर जहरी टीका केली होती.

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते कि  “काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं.”

शरद पवारांनी घेतला धनंजय मुंडे यांच्याबाबत हा निर्णय………

तर आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिकवर टीका करताना आपल्या ट्विट मध्ये म्हणाले होते कि “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.”    

Related Posts
1 of 1,332

             शहरात अज्ञात चोरटय़ांनी पती पत्नीस बेदम मारहाण करून एक लाख 11 हजाराची चोरी

भाजप नेते निलेश राणे यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिला आहे. निलेश राणेला उत्तर देत ते म्हणाले कि  ते  वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते.त्यावेळी तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या टीकेला आपल्या  स्टाईलने उत्तर दिला आहे.  

                     प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही – संजय राऊत 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: