त्यांनाही वर्क फ्रॉम होम : अत्यावश्यक सेवा वगळल्या


अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकले यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली असता शहरात वाढत्या रुग्णांमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कर्मचारी घरून काम करणार असल्याचा निर्णय झालाय . कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला असल्याचे सांगण्यात आलेय . पुढील सात दिवस घरूनच मनपा कर्मचारी घरूनच कामकाज करणार आहेत . फार्मासिस्ट कर्मचाऱ्यांना विश्रांती देऊन दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार त्याचसुन ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५५ हुन अधिक आहे अशा कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम दिले जाणार नाही . सर्दी , खोकला , ताप , अशी लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी . कर्मचाऱ्यांनी मोबाइलला चालू ठेवावेत जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही .