तोडणीला आलेल्या फळांवर तेलकट काळे डाग पडल्याने मोठे नुकसान


सुमारे आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील फळांचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालय . दरवर्षी डाळिंबाला प्रती किलोला साधारण ७० ते ८० रुपयाचा मिळणारा दरपंधरा ते वीस रुपयांवर असून उत्पादकांना सुमारे सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात राहुरी, राहाता, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, नगर तालुक्यांत डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. साधारण वीस हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर आंबिया बहार घेतला जातो. हीच फळे सध्या विक्रीला आलेली आहेत. मात्र जिल्हाभरात डाळिंबावर तेलकट डाग, करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ८० टक्के बागांमधील फळे काळी पडली आहेत. साधारण ५० टक्के डाळिंब फळांची जागेवर फळगळ झालेली असल्याने ती फेकून दिल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. त्यातही जी फळे विक्रीला नेली जात आहेत, त्यालाही गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस रुपये प्रती किलोला कमी मिळत आहेत. त्यामुळे यंदा डाळिंबाचे उत्पादनही तोट्यातच . “आमच्याकडे सात एकरावर डाळिंब आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के नुकसान झाले आहे अशी माहिती शेतकरी शेतकरी रावसाहेब वर्पे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली
जिल्हाभरात सुमारे सहाशे ते सातशे कोटी रुपयांचा फटका बसला असून हे मोठे नुकसान असल्याने डाळिंब उत्पादक हतबल झाले आहेत. जास्त पाऊस असल्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठा नुकसान झालेय त्यामुळे प्रशासनाला पंचनामे दिले आहेत असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले,