तुम्हाला समजत नाही असं सांगण्याची हिंमत लोक करत नाहीत : राहुल गांधींचा मोदींना टोला !

0 13

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला मारला आहे .काही दिवसापूर्वी मोदींनी पवन चक्क्यांच्या माध्यमातून ऊर्जे, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि ऑक्सिजनही मिळू शकतो का यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली होती. यावरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी म्हटले आहे, मोदींना समजत नाही यापेक्षा ‘तुम्हाला समजत नाही’ असं सांगण्याची हिंमत त्यांच्या आजूबाजूचे लोक करत नाहीत. हेच देशासाठी अधिक धोकादायक आहे.राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे.

Related Posts
1 of 253

पवन चक्क्यांच्या मदतीने पाण्यातील बाष्प जमा करुन त्यापासून पिण्याचे स्वच्छ पाणीमिळू शकते का तसेच पवन चक्क्यांच्या मदतीने ऑक्सिजन वेगळा काढता येईल का प्रश्न मोदींनी तज्ज्ञाला विचारला होता .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: