
शिर्डी – भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राज्य सरकारवर मराठा आरक्षणावरून तसेच इतर सर्व मुद्द्यावर सरकारच्या समाचार घेतला ते म्हणाले तिन तिघाडी अन काम बिघाडी असलेली महाविकास आघाडी सत्ता टिकवण्याच्या नादात मराठा आरक्षणाचा मुद्दा या सरकारने वा-यावर सोडला .
सर्वाच्च न्यायालयाने दिलेली स्थगीतीला महाविकास आघाडीच जबाबदार आहे धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रोश करतोय.आरक्षणच नाही तर सर्वच आघाड्यावर हे सरकार अपयशी झाले आहे याचा जाब जनता सरकारला विचारणार अशी विखे पाटलांचा सरकारवर घणाघाती टीका केली.नविन कायद्यामुळे शेतकरी बाजार समितीच्या जोखडातून आता शेतकरी मुक्त होणार आहे. कृषी क्षेत्रातील कृषी उत्पादन आणि वितरण अधिक सक्षम झाले आहे.
फक्त फेसबूकवर संवाद साधण्याच काम –
प्रत्यक्ष जनतेसाठी राज्य सरकारचे काम कुठही दिसत नाही
बाळासाहेब थोरातांनी जीडीपीची चिंता करू नये त्यासाठी पंतप्रधान सक्षम फक्त बदल्यांचा कारभार उत्तम झाला मात्र जनतेसाठी काहीही नाही.
मागिल सहा महिन्यात राज्यातील जनतेला वा-यावर सोडल याचे प्रायश्चित करण्याची तयारी ठेवा अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर शिर्डी येथे केली आहे .