तालुक्यात चोरीच्या दुचाकीसह अट्टल दरोडेखोर जेरबंद……..

0 29

 श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा,कर्जत,बेलवंडी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असणारा अट्टल दरोडेखोर गणेश शिवाजी काळे रा तांदळी दुमाला याला श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा लावून जेरबंद केला आहे. किंमतीची चोरीची पल्सर दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.

दि १० जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलिसांना आढळगाव तांदळी रस्त्याने एक इसम चोरीची दुचाकी घेऊन जोरात चालला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी आढळगाव ओढ्यात सापळा लावून या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही श्रीगोंदा शहरातून चोरल्याचे त्याने कबूल केले सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
काळे हा बेलवंडी पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यात फरार होता काळे हा अट्टल दरोडेखोर जेरबंद झाल्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे सदर कारवाई श्रीगोंदा पो नि ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि दिलीप तेजनकर,पो हे कॉ अंकुश ढवळे,पो कॉ प्रकाश मांडगे,पो कॉ दादासाहेब टाके,पो कॉ किरण बोराडे,पो कॉ संजय काळे,पो कॉ इंगवले या पथकाने केली पुढील तपास पो हे कॉ रोहिदास झुंझार हे करत आहेत.
Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: