तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न


टाकळी ढोकेश्वर- तहसीलदार देवरे हे कार्जुले ह्या येथील कोविड सेंटरला भेट देऊन नगर-कल्याण महामार्गावरून टाकळी ढोकेश्वर येथून पारनेर कडे येत होते. या गावातील त्रिमूर्ती पेट्रोल पंपावर थांबले असता तिथे एक डंपर मधून पाणी पडताना दिसले त्या मध्ये वाळू अाहे हे स्पष्ट झाले तेव्हा तहसीलदारनी त्या डंपरचा पाठलाग जवळपास ५ किलोमीटर केला. जेव्हा ही बाब डंपर चालकाच्या लक्षात आली तेव्हा त्याने डंपर तहसीलदारच्या गाडी वर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तहसीलदारचा चालक हे सतक असल्यामुळे ते वाचले. डंपर चालक वाहक घेऊन पसार झाला.
डंपरची घेतलेली व्हिडिओ शुटिंग मुळे त्या वाहनांचा नंबर मिळाला. नंबरची मदत घेऊन डंपर चालक व मालक यांचा पत्ता मिळाला ते दोघे वनकुटे येथील अाहे. त्यांचा वर तहसीलदारच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.