तहसीलदारांच्या जोडीला वाळूतस्कर गोडीला ,सर्व सामान्य नागरिकांना खेटरांची किंमत

0 31

श्रीगोंदा  –    श्रीगोंदा तालुक्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली असून चक्क तहसीलदार यांच्या दिमतीला वाळू तस्कर असल्याने तहसिदार सर्व सामान्य नागरिकांशी मोठ्या प्रमाणात अरेरावी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे तहसीलदार याना आपण लोकसेवक असल्याचा विसर पडला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे त्याचे कारण आहे नूतन तहसीलदार यांचे दुट्टपी धोरण त्यांनी आपल्या राहत्या तालुक्यातून अनेक जण श्रीगोंदा तालुक्यात आयात केले आहेत स्वतः चालकही आयात केलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी सुरु आहे तसेच कारवाई होते फक्त तालुक्याच्या पूर्व व उत्तर तसेच दक्षिण भागात होते मात्र तालुक्यातील पश्चिम भागात सुसाट वेगाने तस्करी सुरु आहे त्याचे कारण तहसीलदार यांच्या दिमतीला सकाळी पासून सायंकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर असतात मग तहसीलदार यांच्या त्याच्यासोबत जेवणावळी होत असल्याची तालुकाभर चर्चा आहे.

                      धनंजय मुंडे प्रकरणात कोणतेही राजकारण होता कामा नये – संजय राऊत

त्यामुळे तालुक्यात नेमके काय चालले आहे याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही त्यामुळे वाळूतस्कर हाताशी असल्यामुळे तहसीलदार सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अरेरावी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे असाच एक प्रकार दि १३ जानेवारी रोजी घडला आहे तालुक्यातील काही पत्रकार ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात माहिती घेण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले असता त्यांनी सांगितले कि ” तुला काय छापयेचे ते छाप त्यास उत्तर देण्यास मी व माझी यंत्रणा सक्षम आहे ” त्यामुळे तहसीलदार हे सर्व सामान्य लोकाबरॊबर लोकशाहीच्या आधारस्तंभ याचाही गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही मात्र मराठीत गाजलेले राजा   राणीच्या जोडीला सात मजली माडीला आहे कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला हे लोकगीत या ठिकाणी तहसीलदार याना लागू पडते असेही सर्व सामान्य नागरिकांचे मत आहे.
Related Posts
1 of 1,290
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीचा पाऊस 
श्रीगोंदा तहसीलदार यांनी पदभार घेतल्यापासून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे तहसीलदार यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या असून याबाबात लवकरच कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सांगितले कि याबाबत अनेक तक्रारी मिळाल्या असून त्यांना याबाबत सूचना दिल्या आहे पुन्हा तक्रार आल्यास त्यास कारवाईस सामोरे जावे लागेल.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: