…तर मी शरद पवारांच्या घराबाहेर ढोल वाजवणार – गोपीचंद पडळकर !

सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे . मराठा आरक्षण पाठोपाठ आता धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत .धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात ‘ढोल बजाओ’ आंदोलन देखील करण्यात आले . गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले. त्याठिकाणी मोर्चेदेखील काढण्यात आले. एवढंच नाही तर गोपीचंद पडळकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पडळकर म्हणाले की – आज धनगर समाज शांततेने आंदोलन जर याकडे गांभीर्याने विचार नाही केला तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करु .तसेच मी स्वतः शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर जाऊन ढोल वाजवणार .
तसेच अनेक बड्या नेत्यांच्या मंडळींच्या घरापुढे धनगराचा मुलगा ढोल वाजवेल आणि झोपेचं सोंग घेतलेल्या नेत्यांना आम्ही जाग करू . धनगर समाजाच्या हितासाठी आम्ही सर्व काही करु.