… तर कंगना कधीच वापरणार नाही ट्विटर !

मुंबई – सध्या अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. विविध कारणांवरून ती मुंबई ,महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडकरांवर टीका करत आहे . सुशांत सिंह प्रकरणावरून सुरु झालेला हा वाद आता दिवसेंदिवस वाढत आहे. काही राजकारणी आणि सेलिब्रिटी कंगनाचे समर्थन करत आहेत. परंतु वाद आता जास्त चिघळला आहे कारण तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तर सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटले आहे.मात्र आता कंगना हा संपूर्ण वाद मिटवण्याचा तयारीत दिसत आहे. तिने चक्क कधीच ट्विटर वापरणार नाही असा दावा केला आहे . मात्र यासाठी तिने एक आव्हान दिले आहे.
कंगनाने म्हटले आहे की ,जर हा वाद मी स्वतःहून सुरु केला असेल तर मी ट्विटर कायमचं सोडून देईल ! तिने ट्विट करून म्हटले आहे की , “लोक मला भांडखोर समजतात , पण मी कधीही स्वत:हून वादाला सुरुवात केली नाही ,समोरून वाद सुरु झाल्यावरच मी उत्तर दिले आहे.जर या वादाला मी सुरुवात केली असेल तर मी ट्विटर वापरने कायमचे सोडून देईन ” पुढे कंगनाने लिहले आहे की , भगवान श्री कृष्ण यांनी सांगितले आहे की जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.आता येणारी परिस्थिती ठरवेल की हा वाद अजून वाढेल कि कंगना कायमचा ट्विटर ला रामराम ठोकेल.