ड्रग्स प्रकरणी शर्लिन चोप्राचा पुन्हा दीपिका पादुकोणवर हल्लाबोल !

0 16

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलीवूडचा ड्रग अँगल समोर आला आणि एकाच खळबळ माजली . या प्रकरणी रकुल प्रीत सिंग , श्रद्धा कपूर , सारा अली खान ,दीपिका पदुकोण यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

ड्रग्स प्रकरणी दीपिका पदुकोणचे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली असून तिच्यावर टीकादेखील होत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रादेखील बॉलिवूडमध्ये ड्रग्स कल्चरबद्दल सातत्याने खळबळजनक दावे करत आहेत.तिने आज पुन्हा एकदा दीपिकावर निशाणा साधला आहे. शर्लिनने ट्विट करत म्हटले आहे की, ‘जर तू ‘माल’ घेतला नाहीत तर तुला १२ वकिलांचा सल्ला का घ्यावा लागला? जे सत्य बोलतात ते घाबरत नाहीत. सत्य असल्यावर मनात भीतीचे स्थान नसते.

Related Posts
1 of 67

शर्लिनने धक्कादायक खुलासे करत म्हटले आहे की , बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर केला जातो.इतकंच नाही तर कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यानंतर जी पार्टी झाली त्यामधील एका पार्टीत स्टार्सच्या पत्नींना ड्रग्ज घेताना पहिले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: