ड्रग्स प्रकरणी आता अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव समोर !

अभिनेता सुशांत सिंह राजपुत याची हत्या की आत्महत्या याचा तपास करताना पोलिसांच्या हाती अनेक धागेदोरे लागले आहते. यात सर्वात मोठा खुलासा झाला तो ड्रग्स प्रकरणाचा , आणि रिया चक्रावतीला अटकदेखील झाली आहे . ड्ग्स कनेक्शनचा तपास एनसीबीची टीम करत आहे.या प्रकरणी आता अनेक बड्या कलाकारांची नावं उघडकीस येत आहेत.श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान कलाकारांप्रमाणे आता फेमस अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाव समोर आले आहे .
तपासादरम्यान एनसीबीच्या एक व्हॉट्सऍप चॅट मिळाली आहे , ज्यामध्ये यामध्ये ड्रग्सच्या खरेदी-विक्रीची चर्चा झाल्याचे समोर आलं आहे, आज तकनं वृत्त दिलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे खुलासे झाले आहेत .
याप्रकारावरून समजतं आहे की ड्रग्स चा विळखा मोठ्या प्रमाणात बॉलीवूड मध्ये घट्ट झाला आहे.या मुद्द्यावर संसदेतदेखील चर्चा झाली . भाजपा खासदार रवि किशन म्हणाले होते की देशाच्या तरूण पिढीला ड्रग्सच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे .