ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता..?

0 42

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणातील समोर आलेल्या बॉलिवुड मधील ड्रेस प्रकरण तपास करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) रडारवर बडे सेलिब्रिटी आले आहेत.

दरम्यान मोठया तीन अभिनेत्रींची चौकशी सुरू आहे, तर आणखी तीन अभिनेत्यांना समन्स पाठवला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे . दरम्यान या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच असल्याचं समोर आलं आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती मोठी माहिती लागली आहे. बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटमागे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. तो याआधी सुपरमॉडेल राहिला आहे.

Related Posts
1 of 1,420

अटक केलेल्या बहुतेक ड्रग्ज पेडलर्सनी या अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. हा अभिनेता ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असतो आणि इंडस्ट्रीमधील कित्येक लोकांना ड्रग्ज मिळवून देतो. हा अभिनेता नेमका कोण हे अजून समोर आलं नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: