ड्रग्ज प्रकरण दीपिका एनसीबी समोर हजर

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आजचा दिवस फार महत्वाचा मानला जात आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण याची आज चौकशी होणार आहे या मुळे ते आज सकाळी १० वाजता एनसीबीचे कार्यलयात हाजिर झाली आहे. दीपिका बरोबरच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा आली खान यांची पण चौकशी होत आहे. २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुलप्रीत सिंगची चौकशी करण्यात आली होती . सुत्रा नुसार रकुलप्रीतने संपूर्ण दोष रिया चक्रवर्तीच्या वर टाकला आहे .
एनसीबी दीपिकाच्या मॅनेजर करिश्माची आज पुन्हा चौकशी करणार आहे. करिश्माही एनसीबी गेस्ट हाऊस मध्येही चौकशी होणार आहे . सुत्रा नुसार असं म्हटलं जातं की, करिश्मा आणि दीपिका पादुकोण यांना आज समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील. रिपोर्ट्सनुसार, करिश्माने ड्रग्ज चॅटची कबुली दिली आहे. मात्र ड्रग्ज संदर्भात ती फारच मोघम उत्तर देत आहे. शुक्रवारी रकुलप्रीतसमोरही करिश्माची चौकशी करण्यात आली.