ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अभिनेत्रीचा नाव आला समोर……

0 45

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर अनेक अभिनेत्रींचं ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर येत आहे.

एनसीबीच्या तपासात मोठ्या मोठ्या अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. कालच अभिनेत्री दीपिका पादुकोण याचं सुद्धा या प्रकरणात नाव समोर आला होता. तर आज या प्रकरणात दिया मिर्झाचं नाव जोडलं जातं आहे.

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिया मिर्झाचंही नाव असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून केला जातो आहे. एनसीबीने दिया मिर्झाला देखील समन्स बजावणार असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत एनसीबीने आता पर्यंत आपली काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Posts
1 of 1,404

या प्रकरणात आपलं नाव समोर येताच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत दियाने आपली बाजू मांडली आहे. आपल्यावरील सर्व आरोप तिनं फेटाळून लावले आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: