डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण

न्यूयॉर्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे .,तसेच त्यांची पत्नी आणि अमेरिका ची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
याबाबत बाबतची माहिती स्व: ता डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून दिली आहे.त्यांनी ट्विट करून सांगितले की मी आणि माझी पत्नी मेलानिया ट्रम्प आमच्या दोघांची कोरोना चाचणी रिपोर्ट सकारात्मक आली आहे यामुळे आम्ही तात्काळ क्वारंटाईन होत आहे.
मागच्या काही महिन्यापूर्वी जेव्हा अमेरिकेत कोरोना खूप वाढत होता तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कुठलाही मास्क वापरणार नाही असे सांगितले होते.