डॉ.अरोळे हॉस्पिटलने कोरोना महामारीच्या काळात मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली – प्रा. राम शिंदे                                                           

0 48

जामखेड – डॉ. रजनीकांत व मेबल अरोळे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपत जी सेवा जनतेला दिली त्याचा वारसा चालवत डॉ. शोभा आरोळे व रवीदादा अरोळे यांनी कोरोना महामारीच्या काळात मोफत देऊन जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम आज त्यानी केले आहे यापुढील काळात या हॉस्पिटलला जी मदत लागेल ती देण्याची ग्वाही भाजप प्रदेशउपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांनी ग्वाही दिली. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा भाजपच्या वतीने सेवा सप्ताह १७ ते २३ पर्यंत अयोजीत केले आहे. त्यानुसार भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै. शरद कार्ले व शहराध्यक्ष अभिजीत राळेभात तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांनी डॉ. अरोळे यांच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला एक महीना पुरेल एवढे धान्य व किराणा माजी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचे संचालक रवीदादा अरोळे व डॉ. शोभा आरोळे यांना प्रदान करण्यात आलला त्यावेळी  अयोजीत कार्यक्रमात प्रा. राम शिंदे बोलत होते. 


    माजी मंत्री प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, डॉ. अरोळे हॉस्पिटलने मागील सहा महिन्यापासून तालुका व तालुक्याबाहेरील व्यक्तींना मोफत सेवा देऊन उपकृत केले आहे. हीच सेवा मात्र इतर खाजगी हॉस्पिटलला एका व्यक्तीकडून दोन ते तीन लाख रुपये बील घेतले जात असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे या अरोळे हॉस्पिटलला काय मदत लागेल याबाबत डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, शरद कार्ले, अभिजित राळेभात यांना सांगून ती मदत पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज वाटप करीत आहोत. 


        ते पुढे म्हणाले, या कोरोना महामारीच्या काळात एखाद्याला कोरोना झाला तर त्याकडे नि:स्पृह भावनेने पाहिले जाते बाहेरचे माणसे त्यांना मदत तर दूरच पण बोलत नाही एवढेच नव्हे तर घरातील व्यक्तीं त्यांच्याकडे नीट पाहत नाही त्यामुळे त्यांचा द्वेष न करता त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे मी सुद्धा माझ्या ओळखीने पुणे नगर येथे रूग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहेत. यापुढील काळात डॉ. अरोळे हॉस्पिटलला आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली. 


     यावेळी पं.स.सभापती रवी सुरवसे, माजी सभापती भगवान मुरूमकर, जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, शहराध्यक्ष अभिजित राळेभात,  नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सोमनाथ राळेभात, पिंपरखेडचे सरपंच बापूसाहेब ढवळे, चेअरमन उध्दव हुलगुंडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, तालुकाध्यक्ष आसिफ शेख, पांडुरंग उबाळे, संतोष गव्हाळे, मकरंद राऊत, जालिंदर चव्हाण, डॉ.गणेश जगताप, डॉ. विठ्ठल राळेभात आदी उपस्थित होते.  

Related Posts
1 of 2,047

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: