“डी -स्ट्रेस” ही मदतीला , ८४४८४४०७७३ मार्फत  मोफत समुपदेशन

0 66
Related Posts
1 of 2,052

अहमदनगर : कोरोनाची चिंता आणि चिता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून कोरोना पॉसिटीव्ह आहे हे समजले तरी अर्ध मेल्यासारखं होत . याच धर्तीवर नागरिकांमधील भय काढण्यासाठी तसेच मानसिक आधार देण्यासाठी समाजकार्य , मानस शास्त्राचे प्राध्यापक तसेच प्रशिक्षित कार्यकर्ते यांच्या सक्रिय सहभागाने डॉ भा . पा .हिवाळे यांची सी एस आर डी  संस्था तसेच भारतातील इतर संस्थांनी एकत्र डी -स्ट्रेस हि हेल्पलाईन सुरु केली असून त्यामार्फत कोरोना नैराश्य आलेल्यांचे ब्रेन वॉश होणार आहे . आत्तापर्यंत ५००हुन अधिक कॉल्स या हेल्पलाईन वॉर येऊन गेले आहेत . नेमका संसर्ग कसा होतो ? झाल्यास कशी काळजी घ्यावी ? योग्य उपचार कसे भेटतील ? काढा किंवा गरम पाणी पिल्याने विषाणू कसा मरतो ? अशा प्रश्नाचे उत्तर मिळून मानसिक आधार भेटतो . गरजू नागरिकांनी ८४४८४४०७७३ या हेल्पलाईन  वरती  कॉल  करून समुपदेशनाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन  सी एस आर डी चे संचालक डॉ . सुरेश पठारे यांनी केले आहे .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: