ठेकेदाराकडून देवस्थानच्या जमिनीतून बेकायदा मुरूम उत्खनन….

0 37

दादा सोनवणे /श्रीगोंदा 

 श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यातील तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून लिंपणगाव येथून ठेकेदाराकडून मोठ्याप्रमाणात मुरुम चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिक्रापूर वरून श्रीगोंदा मार्गे बीड जाणाऱ्या महामार्गाचे कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू आहे या रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरमाची त्यांनी लिंपणगाव येथील शेती गट न 2 व 265 मधून मुरूम उचलण्याची रीतसर परवानगी घेतली मात्र लिंपणगाव या ठिकाणी विठ्ठल रखुमाई नावाचे एक मंदिर आहे त्या मंदिरावर काही ट्रस्टी आहेत त्यातील एक ट्रस्टीच्या जावयाने ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून त्यांचेकडून आर्थिक तडजोड करून मुरूम वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे त्यानुसार ठेकेदाराने लिंपणगाव हद्दीमधील देवस्थान गट न 353 मधून सुमारे हजारो ब्रास मुरून रस्त्याकामासाठी वाहून नेला आहे मात्र कोणताही अधिकार नसताना ट्रस्टीच्या जावयाने नेमका कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार खुलेआम केला आहे.
Related Posts
1 of 1,292

बाळ बोठेला लपविण्याकरीता कोणत्या मंत्र्यानी ताकत पणाला लावली आहे का ?   

याबाबत लिंपणगाव येथील ग्रामस्थांनी काहीश्या प्रमाणात विरोध केला असता त्यास गावातील लोकांसह सर्वच स्तरातून दमदाटी करण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच ठेकेदाराने त्या ठिकाणी असलेली उत्खनन करणारी जेसीबी यंत्र तसेच वाहतूक करणारे ढपर घटनास्थळावून तात्काळ लंपास केले रात्री उशिरा याबाबत सविस्तर माहिती तहसीलदार यांच्या कानावर घालण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन न उचलणे पसंद केले याबाबत सकाळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी नी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी तलाठी आणि सर्कल यांना लिंपणगाव या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश पारित केले.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरण । बाळ बोठेच्या स्टँडिंग अर्जावर बुधवारी होणार निर्णय

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: