ठाकरे सरकार अहंकारी, प्रवीण दरेकरांची टीका !

देशभरासह राज्यातदेखील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे .या परिस्थीला कोण जबाबदार असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे .अशातच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांवरून सरकारवर थेट टीका केली आहे . दरेकरांनी आरोप केला आहे की – उद्धव ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार असून आमच्या सूचनांची ते दखल घेत नाहीत .आमच्या सूचनांची दाखल घेतली असती तर कदाचित खूप प्रश्न मार्गी लागले असते.
दरेकर पुढे म्हणाले की पुणे तिथं काय उणं अशी पुण्याची ओळख आहे. नेहमीच पुणे वरच्या क्रमांकावर असते मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येतदेखील दुर्देवाने पुण्याचा वरचा क्रमानं आहे . पुण्याची हि परिस्थिती असणे ही आमच्यासाठी शरमेची गोष्ट आहे.
जर सरकारने परिस्थिती स्वीकारून ,विरोधी पक्षाच्या सूचना स्विकारल्या तर बरेचशे प्रश्न सुटले असते .आम्ही व्यवस्थेतील दाखवलेले दोष मान्य करुन उपाययोजना करायच्या सोडून विरोधीपक्ष राजकारण करतेय असं सरकारला वाटू लागले. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यावर सरकार अपयशी ठरले आहे .