ठाकरे सरकारवर टीका करत मनसेचे गांधीजींना अभिवादन !

0 15

आज २ ऑक्टोबर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती . यानिमित्त गांधीजींना देशभरातून अभिवादन केले जात आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी मनसेने एक व्हिडिओ ट्विट करत ठाकरेंसारकारला टोला देखील दिला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते.मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण झाले नाही.यावरूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Related Posts
1 of 257

संदीप देशपांडे यांनी , ‘रघुपती राघव राजाराम… पतित पावन सीताराम… सरकार को सन्मती दे भगवान’ असे म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन असे म्हणत त्यांनी गांधीजींना अभिवादन केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: