DNA मराठी

टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळेदुःखद  निधन 

0 89
Related Posts

e9cb22df0a045c8304dda55a57b82a32

e9cb22df0a045c8304dda55a57b82a32

1 of 30

अहमदनगर : टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आले . खरंतर रायकरांना  ओळखत नाही, असा नगरच्या मीडियात क्वचितच एखादी व्यक्ती  सापडेल. सुस्वभावी हसरा स्वभाव , सर्वच माध्यमातील बहुतेक पत्रकारांशी पांडुरंगाची छान मैत्री होती. त्यांचं अकाली  जाणं मनाला चटका लावणारंच आहे . कोरोना उपचार चालू असताना त्यांना बेड आणि व्हेंटिलेटर वेळेवरती न भेटल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला . त्यातही अत्यंतिक दुर्दैवीच. समाजातील प्रश्नांसाठी लढणारा हा हाडाचा  स्वतःच्या प्रश्नाची लढाई मात्र हरला. हि वेळ कुणावरच येऊ नये . त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: