ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

0 56

सातारा- मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज सातारा मधील प्रतिभा हॉस्पिटल येथे निधन झालं आहे. मागचा काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती.

त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Related Posts
1 of 131

आशालता वाबगावकर यांचा थोडक्यात परिचय-
आशालता वाबगावकर यांनी अनेक मराठी चित्रपटात  काम केला आहे.अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर ते  मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या आई माझी काळूबाई या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होते. 

ते मागच्या ५ दिवसा पासुन अति दक्षता विभागात व्हेंटिलेटर वर होत्या परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास काहीच प्रतिसाद दिला नाही अशी माहिती अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे यांनी दिली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: