ज्यांनी राहुल गांधींना ‘हे’ शिकवलंय त्यांना सॅल्युट , भाजप नेत्याचा निशाणा !

0 46

भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राहुल गांधी यांना इतका हाय क्वॉलिटी नशा कुठून मिळतो? असा प्रश्न करीत नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त वाक्य केले आहे. कृषी कायदा आणि भारत चीन तणावावरून राहुल गांधी मोदी सरकार टीका करीत आहेत .यावरून मिश्रा यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, १० दिवसांत कर्जमाफी, चीनला १५ मिनिटांत बाहेर करणं. ज्यांनी राहुल गांधींना हे शिकवलंय त्यांना मी सॅल्युट करतो… राहुल गांधींना इतका हाय क्वॉलिटी नशा मिळतो तरी कुठून?

Related Posts
1 of 253

दरम्यान राहुल गांधी यांनी विधान केले होते की, जर आमचे सरकार असते तर मिनिटांत चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं .कोरोनाशी लढताना भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले तसेच देशातील शेतकरी आणि मजूर दुबळे झाले आहेत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: