जेफ बेजोस यांना मागे टाकत एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0 16

   नवी दिल्ली –  २०१७ पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे आणि अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत  स्पेसएक्स आणि टेस्ला या  इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये काल गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाल्याने मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले.

     हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली. ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान, जेफ बेजोस ब्लूमबर्गच्या या यादीत ऑक्टोबर २०१७ पासून पहिल्या स्थानावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.

आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी पुढच्या महिन्यात लिलाव होण्याची शक्यता    

काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे.   गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली. चांगला फायदा झाल्याने गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत ७४३ टक्के वाढ झाली. सहा जानेवारीपर्यंत एलन मस्क यांची संपत्ती १८१ अब्ज डॉलरवर पोहोचली होती.

        पत्रकार बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा जिल्ह्यातील २१ पोलीसठाण्याला आदेश 

Related Posts
1 of 1,291
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: