जीव धोक्यात घालणाऱ्या त्यांना २५ लाखांचे विमा कवच


अहमदनगर : कोरोनाची भीती तर सर्वांनाच असून साधं लक्षण जरी आढळून आलं तरी आपण लांब होतो .परंतु ग्रामिण भागात कुणाचा कोरोनामुळे जर मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या काही समाजसेवकांना जीव धोक्यात घालून हे केल्याबद्दल २५ लाखांचा विमा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलाय . जे सरकारी कर्मचारी नाहीत पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने कोरोनामुळे मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार करतात आणि संसर्गामुळे मृत्यू झाल्यास अशा धाडसी कोरोना योद्धांना ३० तारखेपर्यंत विमा संरक्षण देणार आहेत .अशा कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक तसेच मृत्यूच्या १४ दिवसा अधीपर्यंत कर्तव्यावर हजर असला पाहिजे अशा अटी आहेत .