जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैकच्या वतीने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुधनासाठी दोनशे कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करुन देऊ- शिवाजी राव कर्डिले

0 22

अहमदनगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैकच्या वतीने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुधनासाठी दोनशे कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करुन देणार आहे.

कोरोना मुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगीतले.

नगर तालुक्यातील खडकी , खंडाळा , हिवरे झरे , बाबुडी बेंद येथील २८१ शेतकऱ्यांना खेळते भांडवलचा चेक वाटप खडकी येथील एडीसीसी बँकेच्या शाखेत माजी.आ. शिवाजीराव कर्डाले यांच्या हस्ते चेक वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला यावेळी ते बोलत होते .

यावेळी कर्डाले म्हणाले कोरोना मुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे . अश्या परिस्थिती शेतकऱ्याना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने कमी व्याजदरामध्ये शेतकऱ्याना दहा हजार रुपयापासून दिड लाख रुपयापर्यत कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी प्रस्ताव मांडला त्याला सर्वांनी होकार दिला .

Related Posts
1 of 23


खडकी , हिवरे झरे , खंडाळा बाबुडी बेंद येथील जवळपास तीनशे शेतकऱ्यांना तीन कोटी रूपायाचे खेळते भांडवल चेकचे वाटप करण्यात आले . उरलेल्या ३९ शाखामधून पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज वाटप करणार आहे . नगर तालुक्यात दोनशे कोटी रूपायाचे कर्ज वाटप करणार असल्याचे कर्डीले यांनी सांगीतले .

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे , उपसभापती संतोष म्हस्के , रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग , मनोज कोकाटे , दादा दरेकर , मोहन गहिले , आणणा चोभे, हरीभाऊ , युवराज पडोळकर , बाळासाहेब पोट घन उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: