जिल्हा बँकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यामुळेच गावातील सोसायट्या बदनाम

0 23

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माजी चेरमन ने गावातील सोसायटी मार्फत गृहकर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता मात्र तो अर्ज गेल्या २१ दिवसापासून जिल्हा बँकेच्या श्रीगोंदा कार्यालयात धूळ खात पडून होते मात्र कर्मचारी यांच्याकडून कर्ज अर्जदारास उडउडवीची उत्तरे दिली जात होती.

 उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी उमेश यादव जागी टी नटराजनला संघात स्थान 

मात्र अखेर त्या कर्जदाराच्या पारा चढला आणि त्या कर्जदाराने गोड शब्दात तेथील कर्मचारी यांची हजेरी घेण्यास सुरवात केली त्यावेळी तेथील गट विकास अधिकारी जगताप हे धावून आले आणि याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रकरण शोधण्याचे आदेश दिले मग शिपायांची चांगलीच धावपळ सुरु झाली त्यावेळी तब्बल अर्धा तास शोधल्यावर प्रकरण धूळ खात पडलेल्या अवस्थेत एका कपाटात आढळून आले आणि शिपायाने प्रकरण जगताप साहेब यांच्या टेबलावर आणले आणि जगताप यांनी प्रकरण उचकटून पहिले असता त्यावर तब्बल २१ दिवसांपूर्वीची तारीख आढळून जगताप यांनी कर्जदार त्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त केली आणि प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले .

Related Posts
1 of 1,290
त्यानंतर संबंधित कर्जदार यांनी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना सुनावले मात्र यामुळेच जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामकुचार पणामुळे नाहक गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बदनाम होत आहे त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे असे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे. कामाला उशीर झाला तर अधिकाऱ्यांना जाब विचारा :- जिल्हा बँक संचालक  अहमदनगर जिल्हा बँकेत जर कोणाच्याही कामाला उशीर होत असल्यास त्याचा जाब अधिकाऱ्यांना विचारा असेही जिल्हा बँकेच्या संचालक दत्तात्रय पानसरे यांनी सांगितले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: