जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली

अहमदनगर – नुकताच ५ महिन्या पूर्वी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकचे पदभार स्वीकारणाऱ्या अखिलेश कुमार सिंह यांची बदली करून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सोलापूर ग्रामीण येथील मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात पोलीस अधीक्षक ,पोलीस उपायुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक या श्रेणीतील अधिकाऱ्याची बदलांचे आदेश राज्य सरकारने काल काढले होते. मनोज पाटील येत्या २ दिवसात अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकाचे पदभार स्वीकारणार आहे . मात्र अखिलेश कुमार यांची बदलीचे ठिकाण आता पर्यंत स्पष्ट झालेला नाही . अवघ्या ५ महिन्यातच शासनाने अखिलेश कुमार सिंह यांची बदली केली आहे .