जिल्हापरिषद मध्ये चार कर्मचारी पॉझिटिव

अहमदनगर- जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या प्रादुर्भाव होत आहे. त्यापासून जिल्हा मधील सर्व कार्यालय वंचित राहिलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या सर्व ग्रामीण भागातील जनतेशी संपर्क असल्याने बहुतांश कर्मचारीला कोरोनाची बांधा झाली आहे काहींना तर जीव सुद्धा गमावला लागला म्हणून कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती की, सर्वांना सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी त्यांची यांची दक्षता घेऊन प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्याशी चर्चा करून घेतला.
जवळपास ३५० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये फक्त चार रिपोर्ट सकारात्मक आली आहे. या तपासणीचा उद्देश फक्त एकच होता की येणाऱ्या काळात कोणत्याही कर्मचार्याला कोरोना होऊ नये तसेच जिल्हा परिषदेच्या काम योग्यरीत्या चालावा अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.