जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार : ‘या’ प्रकरणी किरीट सोमय्या यांचा सवाल !

0 28

फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहली होती .त्यानंतर संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात मारहाण झाली होती.या घटनेच्या सहा महिन्यांनंतर तीन पोलिसांना अटक करून कारवाई करण्यात आली .याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचं अपहरण केलं, घरी आणलं आणि मारहाण केली. याप्रकरणी आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार ? असा सवाल भाजपकडून विचारण्यात येत आहे.

Related Posts
1 of 253

दरम्यान या प्रकरणात मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्यासाठी जात असताना किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: