जिंकून आलं तर पाऊस पाडेल , पाथर्डी तालुक्यात उमेदवाराने दिला आश्वासन

0 23

अहमदनगर –  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी, कार्यकर्ते आपल्याला  मतदान करणाऱ्या नागरिकासाठी आपण तुमच्या साठी रस्ते, वीज,पाणी तसेच अनेक शासकीय योजना लाभ देण्याच्या आश्वासन आपल्या जाहीरनाम्यातून देतच असतात.

मात्र अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रामपंचायतीचे निवडणूकमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या उमेदवारानी आपल्या जाहीरनाम्यामध्ये चक्क पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले आहे. होय पाऊस पाडण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यातुन जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दिला आहे.

तहसीलदारांच्या जोडीला वाळूतस्कर गोडीला ,सर्व सामान्य नागरिकांना खेटरांची किंमत

त्यांनी आपल्या जाहीरनामा मध्ये म्हटले आहे की जर पाच वर्षाच्या कार्यकाळात एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर गावामध्ये दोन हरिनाम सप्ताह केली जातील त्याच बरोबर यज्ञ हवन करून वरूणअस्राचा सिद्ध प्रयोग करून संत नवनाथ व महादेवाच्या कृपेने होमहवन करून गावात पाऊस देखी पाडला जाईल.

Related Posts
1 of 1,290

करूणा शर्मा बरोबर मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो – धनंजय मुंडे 

या आश्वासन व्यतिरिक्त उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की पाच वर्षासाठी मतदारांना शासनाच्या विविध योजनामार्गी लावण्याकरिता त्यांचे मोफत पासपोर्ट फोटो काढून दिले जातील त्यांच्याकडील कागदपत्राची मोफत झेरॉक्स काढून दिले जातील. तसेच शासनाच्या डिजिटल लॉकर  या योजनेअंतर्गत गावातील सर्व ग्रामस्थचे सर्व मुख्य कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर मोफत स्कॅन करून सुरक्षित ठेवली जातील. अश्या प्रकारच्या आश्वासन जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या उमेदवाराने मतदारांना दिले आहे. या आश्वासनाची  सोशल मीडियावर सध्याचांगली चर्चा होत आहे.राज्यात १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारीला लागणार आहे.

  या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही – जयंत पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: