जामखेड शहरातील स्मशानभूमीतील दुरुस्तीसाठी भीक मागो आंदोलन.


जामखेड : जामखेड शहरातील आंबेडकर सर्कल व सदाफुले वस्ती या तीनही ठिकाणी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय झाली आहे. तरी त्यातील काही स्मशानभूमीत कडे जायला रस्ताही राहिलेला नाही .पावसाळ्यात चिखल तुडवताना वेड्या बाभळीतुन वाट काढत जावे लागते. तिथे कोणत्याही प्रकारच्या लाईटची सोय नाही. तेथे पाण्याचीही सोय नाही त्या स्मशानभूमीत शेजारी लोकं संडास सुद्धा करतात त्यामुळे त्या स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करताना खूप दुर्गंधी येते. जीथे मयत व्यक्तीचा अंत्यविधी करतात त्या ठिकाणचे थडगे सुद्धा एकदम खराब झालेले आहेत. त्या ठिकाणी बैठक व्यवस्था नाही. त्या ठिकाणी स्मशानभूमीचे झालेले काम एकदम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे. तरी त्या स्मशानभूमीतील उभा केलेला निवारा एकदम कुचकामी झालेलाआहे.तो कधीही खाली पडू शकते,त्यामुळे अंत्यविधीला आलेल्या लोकांना त्यापासून कधीही कोणत्याही वेळेस धोका होऊ शकतो त्यामध्ये जीवित हानी सुद्धा होऊ शकते या सर्व बाबींकडे जामखेड नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 28 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता स्मशानभूमीच्या उदासीनते साठी जामखेड नगरपरिषदेच्या समोर भीकमागो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, या अत्यावश्यक सेवेसाठी जामखेड नगर परिषदेकडे कोणताही निधी नसल्यामुळे भीकमागो आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे,कृपया या आंदोलनामध्ये जामखेड शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे व या सर्व बाबींचा जाहीर निषेध करण्यात यावा. हे आंदोलन अॅड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली व खालील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आले आहे, बापु ओहोळ, द्वारका पवार, राकेश साळवे वैजीनाथ केसकर,संतोष चव्हाण, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे,अतिश पारवे, रणजीत मेघडंबर, सुनील साळवे, रवी घायतडक, गौरव घायतडक,महेश सदाफुले, आजिनाथ शिंदे,फुलाबाई शेगर, मच्छिंद्र जाधव, मोहन शिंदे, रोहित पवार,योगेश सदाफुले, बाबासाहेब फुलमाळी, आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बापूसाहेब ओहोळ यांनी दिली आहे.