जामखेड मधील खाजगी तीन कोविड सेंटरला भरारी पथकाच्या नोटीसा  

0 46

जामखेड – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल आणि इतर दोन खाजगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम उपचार घेत असलेल्या कोवीड रूग्णांच्या प्राप्त तक्रारी आणि वर्तमान पत्रातील बातमीच्या अधारे भरारी पथकाचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी तीन कोवीड हॉस्पिटलला नोटीसा बजावल्या आहेत. 


 शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची परवानगी असलेले ओम हॉस्पिटलने कोवीड सेंटर महिनाभरापूर्वी चालू केले आहे. येथे कोवीड रूग्णावर मोफत उपचार करताना जामखेड शहर आणि तालुक्यातील कोवीड रूग्णांना या हॉस्पिटलने लाखो रुपये ज्यादा उकळले आहे याबाबतच्या तोंडी आणी लेखी तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांनी, राजकीय पक्ष आणि  विविध संघटनांनी भरारी पथकाकडे करून सदर हॉस्पिटलची मान्यता काढून घ्यावी अशी मागणी केली. 


 याबाबत भरारी पथकाचे प्रमुख परशुराम कोकणी यांनी पाहणी करून खातरजमा केली आहे तसेच इतर दोन खाजगी कोवीड हॉस्पिटलने दोन ते पाच लाख रुपये बील कोवीड रूग्णाकडून घेतल्या आहेत. रूग्णाकडून बील आकारणी करताना पावत्या द्वारे एक लाखाच्या आत रक्कम घेणे आणि पावती न देता रक्कम घेतली जाते असे सर्रास प्रकार चालू आहे या तक्रारीची दखल घेऊन भरारी पथक प्रमुख परशुराम कोकणी यांनी नोटीसा बजावल्या असून हॉस्पिटल चालकांनी दर्शनी भागावर दरपत्रक फलक लिहणे व यापुढील काळात रूग्णाकडून ठरवून दिलेल्या रक्कम पेक्षा जास्त देयके घेण्याच्या तक्रार आल्यास सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येतील अशा नोटिसा भरारी पथक प्रमुख परशुराम कोकणी यांनी तीन कोविड सेंटरला बजावल्या आहेत. 

Related Posts
1 of 1,357
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार करणे सदर हॉस्पिटलला बंधनकारक असताना लाखो रुपयांचे बील संमदीत हॉस्पिटलने घेतले आहे व इतर दोन खाजगी कोवीड सेंटरला परवानगी नाही तरी त्या चालू आहेत आणि कोवीड रूग्णांची लूट करीत आहेत या रूग्णावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून मुख्यमंत्री, राज्यपाल पासून थेट तहसीलदार पर्यंत तक्रार केली आहे. रूग्णावर कोणते उपचार केले जातात आणि औषधे बील दररोज एक प्रत रूग्णाला आणि  भरारी पथकाला दिली तरच लूट थांबेल - अॅड. अरूण जाधव, जिल्हाध्यक्ष वंचित आघाडी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: