जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी…. रगडा पॅटिस

0 28

रगडा पॅटिस बनविण्याकरता सामग्री –

अर्धा किलो बिट व अर्धा किलो बटाट उकडुन घ्यावे.

  •  ५० ग्रॅम नारळाचा किस
  •  १ चमचा तिळ
  •  १ चमचा जिरे
  •  १ चमचा साखर
  •  1 चमचा लिंबुरस
  •  ५–१० काजु तुकडे
  •  १ चमचा किसमिस
  •  १ चमचा आरारोट
  •  मिठ स्वादानुसार
  •  काळे मिरे १० ते १५ दाणे

रगडा पॅटिस बनविण्याचा विधी –

Related Posts
1 of 44

कढईत अर्धा चमचा तेल घेवून त्यात तिळ, जिरे आणि काजु तुकडे टाकून १ मिनिट भाजा त्यात आरारोट, नारळाचा किस टाकुन भाजा. त्यात हिरव्या मिरच्या, मिठ, काळे मिरे साखर, लिंबुरस टाकुन चांगले मिसळुन घ्या. ही फिलींग दोन्ही उकडलेल्या भाज्यात भरायची आहे.

प्रथम बटाटयात तयार फिलींग मिसळून त्याचे गोळे तयार करून त्यास पॅटीसच्या आकाराचे बनवावे नंतर बिटाच्या गरात ही फिलींग मिसळुन त्याचे गोळे बनवुन घ्या. दोन्ही गोळे एकमेकांवर ठेवुन मधात थोडी फिलींग भरून घ्यावी व त्याची पुरी लाटून घ्यावी व गरम तेलात तळून घ्यावी. सोनेरी रंगाची होईपर्यंत तळावीत व गरमागरम खायला दयावीत.

तर आपण आज पाहिली रगडा पॅटिस बनविण्याची विधी या रेसिपी ला अनुसरून आपण चांगल्या रित्या पॅटिस बनवू शकता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: