जाणून घ्या ओव्यापासून आपल्या शरीलाल होणारे फायदे …….

0 25

ओवा / Ajwain हे भारतीय स्वयंपाक घरात खाद्य पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी ह्याचा नियमित वापर केला जातो. हि एक वनौषधी आहे. ह्यातील उग्र सुगंधामुळे यास संस्कृतात उग्र गंध असेही म्हणतात. ओवा या वनौषधीचे स्वास्थकारी आणि औषधीय लाभ आहेत.

पोटासंबंधी आजारासंबंधी हि एक चांगली औषधी मानली जाते. याचे बीज, तेल आणि फुल आणि सालींचा उपयोग बरयाच आजारासाठी औषधी म्हणून करता येतो. शरीरात उदरातील जंतू मारण्यासाठी हि एक प्रभावशाली औषधी आहे. यासोबतच जिर हे कानांतील ठनक, दातांचे दुखणे, एन्फ़्लुएन्जा, हृदयासंबंधी समस्या, वातरोग, नाकातील नसांचे फुगणे ह्या सर्व आजारांवर प्रभावी ठरते. तसेच कामुकता वाढली असेल तर माणसाला शांत आणि थंड ठेवण्यासाठीही याचा वापर होतो.

१.गर्भ धरणात पचना संबंधी समस्या आणि गर्भवती महिलांसाठी अन्न पचनात मदत .

ओव्याचे बीज एन्टीऑक्सिडेटनी भरलेले असतात. जे गर्भवती महिलांसाठी फार उपयोगी ठरतात. तस पाहिलं तर ओवा हे अन्नपदार्थाच्या पचनात सहाय्यक असतात. गर्भवती महिलांच्या कमजोर हाडांना आणि शारीरिक कमजोरीला दूर करण्यास अत्यंत लाभदायक असतात. ओव्याचे बीज गर्भवती महिलांच्या शरीरास आतून मजबूत बनवण्यासाठी हवीशी ताकद देतो. अध्ययानातून हे कळले आहे कि ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनांनी दूध पाजतात त्यांच्यासाठी ओव्याचे बीज फारच लाभदायक आहे.

२.मधुमेहाच्या रोग्यांसाठी ओव्याचे फायदे –

ओव्याचे बीज मधुमेह कमी करण्यास सहाय्यक ठरतात. दररोज ओव्याचे बीज बारीक करून घेतल्यास मधुमेहास नियंत्रणात ठेवता येते.

3.वजन कमी करणे
सामान्यतः यामध्ये वजन कमी करण्याची क्षमता नाही परंतु जे लोक संतुलित आहारातून वजन नियंत्रित करण्यासाठी जो आहार सेवन करतात त्यात ओव्याचा वापर सहाय्यक ठरू शकतो.

४.पचनक्रियेत सहाय्यक

Related Posts
1 of 44

पारंपारिक संग्रहित माहितीतून समजते कि ओवा हे एक उत्तम पाचन खाद्य आहे. अपचनात योग्य पचनक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी जिऱ्याचा वापर नियमित करावा. पालतू जनावरांच्या पचनक्रियेत बिघाड झाल्यास त्यांना ओव्याचीपूड पदार्थात मिसळून देतात. अपचनामुळे होणारे आजार जसे हगवण व उलट्या होणे. याच्या सेवनाने बऱ्यापैकी मदत मिळते.

यासाठी एक कप पाण्यात ओव्याचे बीज थोड बारीक करून उकडून व नंतर थंड केल्यावर नियमित देल्यास डायरिया यासारख्या आजारात उचित लाभ मिळतो. हे एक आयुर्वेदात पेय पचनासंबंधीच्या सर्व व्याध्यांवर अतिशय प्रभावशाली ठरते. ओव्यासोबत थोडी साखर सुद्धा खाता येते. यामुळे पोट दुखणे व फुगणे यावर उपाय म्हणून सेवन करता येते.

५. नवजात बालकांच्या पोटातील दुख्ण्यावरील उपाय

ओव्याचे बीज नवजात बालकांच्या पोटातील दुखण्यावर फारच प्रभावशाली मानले जाते. ओव्याचीपूड स्तनातून काढलेल्या दुधात चिमुटभर मिसळून किंवा स्तनावर थोडीसी लेपून नवजात बालकांच्या पोटातील दुखणे व फुगव्यावर फार उपयोगी ठरू शकते.

पोटात वायू आणि फुगारा येत असल्यास पोट दुखायला लागते. त्यामुळे लहान बालक अस्वस्थ होतात व रडतात त्यासाठी ओव्याचीपूड व थोडस मीठ पाण्यात मिळवून दिल्यास लवकरच त्यांना आराम मिळतो.

६.सर्दी पडस्यापासून लगेच मुक्तता

सर्दी पडसा ह्या वारंवार होणारया आजारापासून बचाव व्हावा यासाठी भारतीय घरांमध्ये ओवा वापरला जातो. एका कपड्यात किंवा डबीत ओव्याचीपूड ठेवून त्याचा सुगंध दिवसातून पाचसहा वेळा घेतल्यास नाकातील बंद पडलेल्या नासा खुलून सर्दीपासून आराम मिळतो. ओव्याचीपूड गुळामध्ये मिसळून त्याचे छोटे छोटे गोल गोळे बनवून रोज सकाळ संध्याकाळी घेतल्यास खोकला व अस्तमाच्या तसेच श्वसनाच्या आजारापासून मुक्तता होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: