जागतिक बँकेने केले चालू वर्षांत ९.६ टक्के घसरणीचे भाकीत

0 47

नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या आगमन होण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्थाची परिस्थिती खराब होती आणि कोरोना नंतर यामध्ये अधिक भर पडली. परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेला कधी नव्हे इतक्या वाईट दिवसांचा सामना करावा लागेल.

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) विद्यमान आर्थिक वर्षांत ९.६ टक्के घसरेल, असे भाकीत जागतिक बँकेने केले.जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्या एकत्रित वार्षिक बैठकीआधी दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांवर केंद्रित हा अहवाल आला आहे. मागील पाच वर्षे सहा टक्के दराने वाढणारे हे क्षेत्र चालू वर्षांत ७.७ टक्के आक्रसण्याचे त्याचे भाकीत आहे.भारतातील स्थिती अपवादात्मक आणि यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही इतकी वाईट आहे, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ हॅन्स टिमर यांनी सांगितले.

Related Posts
1 of 1,357

भारताच्या नजीकच्या भविष्यासंबंधीचा दृष्टिकोनही भयानक आहे, असे त्यांनी नमूद केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: