जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या ’20’ किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील

0 24

कोशिंबीर करताना ती आंबट होणं किंवा बटाट्याचे पराठे लाटताना त्यातून सारण बाहेर येणं, असं होतं का? जर तुम्हाला स्वयंपाक करताना या समस्या जाणवत असतील तर काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कुकींग किचन टीप्स आणि ट्रीक्स. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार. मग तुम्हीही करून पाहा या ट्रीक्स आणि दुसऱ्यांसोबतही शेअर करा या कुकींगआयडियाज…

जेव्हा जेवणात जास्त मीठ पडतं

जर जेवणात कमी मीठ पडलं तर वरून घालता येतं पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो. जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही. पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, थोड्यावेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.

पास्ता किंवा न्यूडल्स शिजवताना चिकट झाल्यास

जर शेवया, पास्ता किंवा न्यूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धूवून घ्या. मग बघा अगदी बाहेरसारखे न्यूडल्स घरी बनतील.

विरजणाशिवाय दही कसं लावावं

जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त सायीचं दही लागेल.

लसणाचा योग्य उपयोग

जर जेवणांमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही. अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी कूटून किंवा किसून घालावा. असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो.

चहा बनवल्यावर चहाचा चोथा टाकू नका

अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात. पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता. चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता.

मोकळा भात कसा शिजवावा

खूप महिलांची अशी तक्रार असते की, भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम गच्च होतो. जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं. यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही.

लिंबाचं सरबत अजून छान कसं बनवता येईल

लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालं ही किसून घालावं.यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल. तसंच लिंबाच्या सालातील सत्त्व ही आपल्याला मिळेल.

सुकामेवा चांगल्यारीतीने कसा ठेवाल

तुम्ही पाहिलं असेल की, बरेचदा सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते. असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअर टाईट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा.

कोशिंबीर आंबट होऊ नये

जेव्हा पाहूणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यांमध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका. कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही.

बटाट्याचे पराठे बनवण्याची योग्य कृती

Related Posts
1 of 44

बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो. असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणीक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावे कडेला नाही. यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही.

आल्याची पेस्ट कशी साठवावी

आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झणका येतो. त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही.

अंडी उकडताना न फुटण्यासाठी

जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. मग अंडी छान उकडली जातील.

एखादा पदार्थ लागल्यामुळे भांड खराब झाल्यास

जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काहीवेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा भांड अगदी चमकेल.

मिक्सरच्या ब्लेडला धारदार करण्यासाठी

काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल.

मऊ ईडल्या बनवण्यासाठी

ईडली मऊ आणि फुगण्यासाठी होण्यासाठी त्याच्या पीठात थोडे उकलेले तांदूळ वाटून घाला. तसंच ईनो किंवा बेकींग सोडा घाला. असं केल्याने ईडल्या मऊ होतील आणि टम्म फुगतील

कांदा कापताना डोळ्यातील अश्रू टाळण्यासाठी

जर तुम्ही कांदा योग्य रीतीने कापल्यास तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. याकरिता कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं होतं. तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही.

झटपट छोले किंवा राजमा बनवण्यासाठी

कडधान्य म्हणजेच छोले, राजमा, वाटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर चिंता नाही. गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा. त्यानंतर एका तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल.

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी

भेडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये. जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल.

जर तुम्हाला या स्वंयपाक घरातल्या सोप्या टीप्स आणि ट्रीक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांना ही नक्की सांगा.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: