जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा- शरद पवार

0 7

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगली  मधील इस्लामपूर या ठिकाणी एका यूट्यूब चैनलला इंटरव्यू देताना
माझी पण मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे अशा विधान करून राज्याच्या लक्ष आपल्याकडे केंद्रित केला होता.

जयंत पाटील यांच्या या विधानानंतर नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा सुद्धा दिला आहे.

तर आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांचे या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Related Posts
1 of 1,321

पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, असं शरद पवार म्हणाले.

नेमका काय म्हणाले होते जयंत पाटील-
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र आमच्या पक्षाकडं सध्या ते पद नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. ती संख्या पुरेशी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.मंत्रीपदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद भावतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: